फैजपूरला आठ महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजाराचा निधी

0

दिनदयाल अंत्योदय योजअंतर्गत बचत गटांना फिरता निधी

फैजपूर- दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आठ महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप मंगळवारी पालिका सभागृहात मुख्याधिकारी किशोर चव्हाण व नगरसेवक हेमराज चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत फैजपूर शहरात स्थापन करण्यात आलेल्या व नियमित बैठक, बचत, अंतर्गत कर्ज व परतफेड तसेच अद्यावत लेखे असलेल्या पंचसूत्रीचे पालन करणार्‍या आठ महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार या प्रमाणे एकूण 80 हजार रुपयांचा फिरता निधी धनादेशद्वारे वितरीत करण्यात आला.

बचत गटांनी लघू उद्योगातून करावा विकास -मुख्याधिकारी
मुख्याधिकारी किशोर चव्हाण म्हणाले की, आठ बचत गटांना आज फिरता निधी म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. या दिलेल्या रकमेचा महिलांनी त्या पैशातून लहान लघू उद्योग सुरू करावा जेणेकरून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्याच रोजगारातून मिळालेल्या पैशातून घरात हातभार लागेल. तसेच बचत गटांनी फैजपूर शहर स्वच्छ अभियानात सहभाग नोंदवा आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल या साठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या महिला बचत गटांना मिळाला धनादेश
रेहान बचतगट, ओमसाई, रमाई, रेणुकाई, शिवशक्ती, जय संताजी, कुसुमबाई व हिंगलाजमात महिला बचत गटाला धनादेश देण्यात आला. प्रसंगी नगरसेवक हेमराज चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळ समन्वयक कैलास सोनवणे, प्रवीण सपकाळे, संजय बानाइते, बचत गटाच्या अध्यक्ष विद्या सरोदे, दिलीप वाघमारे व विक्की बागुल यांची उपस्थिती होती.