फैजपूरांना दिलासा : त्या संशयीत रुग्णाला कोरोनाची लक्षणे नाही

0

फैजपूर : शहरातील एकाला कोरोनासदृश विषाणूची लक्षणे आढळल्यानंतर त्यास सोमवारी रात्री मुक्ताईनगरच्या रुग्णवाहिकेतून जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणांसह रात्री श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या रुग्णाला अधिक उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले होते. रुग्णालयात रात्री अतिदक्षता विभागात दोन तास ठेवण्यात आले त्याला खोकला कोणत्या प्रकारे येतो याची चौकशी डॉक्टरांनी केली व या रुग्णाला कोरोनाचे कुठलेही लक्षणे दिसून न आल्याने त्या रुग्णाला सकाळी औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले. मात्र या रुग्णाला घरी राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे यामुळे फैजपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.