फैजपूरातील सहाय्यक फौजदाराचे हृदयविकाराने निधन

0

फैजपूर- फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार वासुदेव बाबूराव सपकाळे (57) यांचे सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सहाय्यक फौजदार वाससुदेव बाबुराव सपकाळे हे पोलीस गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते. ते रात्रीची गस्तीवरून आल्यानंतर पहाटे चार वाजता आरामासाठी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या खोलीत गेले तर ड्युटी बदलणार म्हणून त्यांच्या जागी पोलीस कर्मचारी सकाळी 10 वाजता आल्यानंतर ते कपडे बदलण्यासाठी सपकाळे झोपलेल्या खोलीत गेले असता सपकाळे यांना उठवल्यानंतरही ते उठले नाहीत. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह हलवल्यानंतर तेथे शवविच्छेदन करण्यात आले तर फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अंजाळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सोमवारी सायंकाळी त्यांच्या मुळगावी अंजाळा, ता.यावल येथे त्यांना फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. यावेळी उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, उपनिरीक्षक रामलाल साठे, आधार निकुंभे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी मानवंदना दिली. दरम्यान सहाययक फौजदार वासुदेव सपकाळे हे एक वर्षाने सेवानिवृत्त होणार होते मात्र कु्ररकाळाने त्यापूर्वीच त्यांना हिरावून नेले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे. वासुदेव सपकाळे यांची दोन्ही मुले मुंबई येथे पोलिस खात्यात कर्तव्यास आहेत.