फैजपूर पालिका स्वीकृत नगरसेवकपदी केतन किरंगे बिनविरोध

0

फैजपूर- फैजपूर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत केतन डिगंबर किरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ.इमरान यांची तीन वर्षांपूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती मात्र त्यांनी वैयक्तिक कारण देत 26 डिसेंबर रोजी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने आगामी दोन वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी गुरुवार, 16 रोजी सकाळी 11 वाजता फैजपूर पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

केतन किरगे यांची बिनविरोध निवड
आगामी दोन वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पदासाठी केतन डिगंबर किरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण तर सभेला भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, काँग्रेस गटनेता कलिमखां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, बांधकाम समिती सभापती हेमराज चौधरी, शिक्षण समिती सभापती देवेंद्र बेंडाळे, मागासवर्गीय समिती सभापती प्रभाकर सपकाळे, नगरसेवक देवेंद्र साळी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
केतन किरंगे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, युवक काँग्रेस शहराध्यक्ष शेख वसीम जनाब, युवक काँग्रेस रावेर विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष मुदस्सर नजर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रामाराव मोरे, काँग्रेस अनु.जाती विभाग जिल्हा सचिव बबन तायडे, युवक काँग्रेसचे हर्षल दाणी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, प्रतिभा मोरे, विद्या भालेराव, मनु टेलर, विक्की किरंगे, हेमंत भारंबे, युवराज किरंगे, उमेश भारंबे, अशोक किरंगे, निलेश किरंगे आदींनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.