फैजपूर पालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

0

नागरीकांमध्ये समाधान ; 59 कोटी 80 लाख 40 हजार 456 रुपयाचा शिलकी अर्थसंकल्प

फैजपूर- फैजपूर पालिकेचा र्सी 2019-20 चा शिलकी अर्थसंकल्प सोमवारी झालेल्या विशेष सभेत सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ नसल्याने सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात शहर विकासावर भर देत असतांना शहरातील बेघर रहिवाशांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे याकरीता पंतप्रधान आवास योजनेतून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महानंदा होले होत्या.

असे उत्पन्न, असा होईल खर्च
अर्थसंकल्प मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सादर केला. वाचन लेखापाल संजय बानाइते यांनी केले. त्यानुसार वित्तीय वर्ष सन 2019-20 या मध्ये शहरातील महसूल उत्पन्नातून रक्कम रुपये 38 कोटी 35 लाख जमा होतील असा अंदाज आहे. या जमा झालेल्या रकमेतून 38 कोटी 34 लाख रुपये खर्च होऊन 75 हजार 244 रुपये शिल्लक राहतील, असा जमा व खर्चाचा अंदाज आहे. शहरातील भांडवली विकास कामे करण्यात करीत विविध अनुदाने व जमा तसेच भांडवली जमा रुपये 21 कोटी 45 लक्ष रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. या रकमेतून सन 2019-20 या वर्षासाठी ही रक्कम खर्च होईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

स्वच्छ व सुंदर शहर संकल्पना साकारणार
नगरपालिकेचे एकूण 59 कोटी 80 लाख 40 हजार 456 रुपये जमा होतील तसेच 59 कोटी 79 लाख 65 हजार 212 रुपये खर्चाची तरतूद करून 75 हजार 244 रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज आहे. या अंदाज पत्रकात शहरातील सार्वजनिक शौचालय बांधण्याकरीता 14 व्या वित्त आयोगातून दोन कोटी रुपये खर्चाची तरतूद, घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी दोन कोटी 25 लाख रुपयाची तरतुद व शहरातील नवीन वस्ती तयार करण्याकरीता विशेष रस्ता अनुदानातून चार कोटी 50 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर हीसंकल्पना राबविण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 75 लाख रूपयाची तरतूद करण्यात आल्याची माहिती लेखापाल संजय बाण