फैजपूर शहरातील फळ विक्रेत्यांना वेळीची मर्यादा

0

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचे आदेश

फैजपूर : कोरोना संजर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. मात्र काही प्रमाणात नागरी विनाकारणणे बाहेर पडतांना दिसत आहे. फैजपूर शहरातील सर्व फळ पालेभाजी विक्रेत्यांना आता सकाळी 7 ते 12 या वेळेत आपली दुकाने सुरू ठेवण्यात यावी अन्यथा कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सर्व फळ विक्रेत्यांना दिले आहे.

अत्यावश्यक सेवांना वेळेची मर्यादा
जळगांव येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने काही भागात अत्यावश्यक सेवांना वेळेची मर्यादा खालून देण्यात आली आहे. नागरिक फळ व पालेभाजी घेण्याचे करणार सांगून विनाकारण बाहेर पडत आहे नाहरिकांनी कोरोना गांभीर्य घेत नसल्याने शहरातील सर्व पलेभाजे व फळ विक्रेतांना सकाळी 7 ते 12 या वेळेतच आपली दुकाने सुरू ठेवावी. अन्यथा हातगाडी घेऊन गावात फिरावे एखाद्या फळ व पालेभाजी विक्रेत्यांची हातगाडी व दुकाने सुरू राहिल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी फळ व पालेभाजी विक्रेत्यांना दिली. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण उपस्थित होते.