बँकेत पैसे लुटणारे तिघे ताब्यात

0

बॅकेत ग्राहकांची दिशाभूल करून रोकड करत होते लंपास
जिल्हा पेठ आणि शहर पोलीसात आहे गुन्हा दाखल

जळगाव । बॅँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या वृध्द ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात कागदी बंडल देऊन ग्राहकांनाच लुटणार्‍या टोळीतील तिघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता नवी पेठेतील बॅँक ऑफ महाराष्टल या बॅँकेच्या बाहेरच पकडले. या टोळीतील एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. या टोळीने शहरात दोन ठिकाणी लुटल्याची कबुली दिली आहे. अब्दुल अव्वल अब्दुल्ला अन्सारी (वय 28 रा.मुबारक मोहल्ला, ता.खैराबाद जि.मऊ उत्तर प्रदेश, ह.मु.ठाकुरपाडा, ठाणे), भावेश लालजी पटेल (वय 37, रा.गांधीधाम भूज, गुजरात ह.मु.पनवेल) व उमेश रमेश कुशवाह (वय 30, रा.झांसी, उत्तर प्रदेश, ह.मु. उल्हास नगर) असे अटक केलेल्या टोळीच्या सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 20 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

सहा महिन्यांपासून टोळी शहरात सक्रिय
आज शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ ही टोळी सक्रिय झाल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हे सर्व आरोपी मुंबई भागातील असून चोरी व दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मागील सहा महिन्यापासून भुसावळा लॉज राहून जळगावात संधी साधून ग्राहकांना बोलण्यात पटवून त्यांच्याजवळी पैसे घेवून फरार होत होते. या अजून काही आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिघांनी यापुर्वी झालेल्या दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सापळा रचून केले जेरबंद
गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील राष्ट्रीयकृत बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आपल्या बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळही पैसे असल्याचे भसवून त्यांच्या जवळी नकली कागदाची गड्डी रूमालात बांधून ग्राहकाच्या हातात देवून फरार होत होते. बँकेच्या बाहेर पैसे लुटण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलिस अधिक्षक सचिन सांगळे यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचारी यांची बैठक घेवून आरोपीना जेरबंद करण्याचे सांगितले.त्याप्रमाणे शहर पोलिस ठाण्याचे पोनि एकनाथ पाडळे यानी गुन्हे शोध पथकातील सफौ वासुदेव सोनवणे, हेका बशीर तडवी, संजय शेलार, संजय हिवरकर, इम्रानअली सैय्यद, अक्रम शेख, नवजीत चौधरी, अमोल विसपुते, सुधीर साळवे असे पथक तयार करून त्यांना बँक परिसरात पेट्रोलिंग करत असतांना तिघांना पकडले.

दोन्ही गुन्ह्याची दिली कबुली
15 मे रोजी शहरातील चित्रा चौकातील दुकानाजवळ एका महीलेचे पर्स मधुन 40 हजार रोख रूपये हे चोरी केल्याची कबुली दिली असून त्यापैकी 20 हजार रोख रूपये त्यांच्याकढून हस्तगत करण्यात आले आहे. त्यांची अधिक विचारपुस करता 25 जुलै रोजी शहरातील स्वातंत्र चौकातील स्टेट बॅक ऑफ इंडिया येथे इसम याने बॅकेतुन पैसे काढत असतांना त्याची टेहाळणी करून सदर इरम याच्याशी गप्पा मारून त्याला कागदाच्या नोटाचे बंडल इसमाच्या हातात देवून त्याच्या जवळील 11 हजार रोख रूपये हे फसवणूक करून पैसे घेवून पळुन गेल्याची कबुली दिली आहे.