बडोदा-रीवा दरम्यान महानमा एक्स्प्रेस ; खान्देशच्या प्रवाशांना दिलासा

0

भुसावळ- वेस्टर्न लाईनवरील रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बडोदा-रीवा दरम्यान महानमा एक्स्प्रेस 9 मार्चपासून सुरू होत असून खान्देशच्या प्रवाशांना या गाडीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. डाऊन गाडी क्रमांक 20905 बडोदा-रीवा महानमा एक्सप्रेस ही 9 रोजी रात्री 7.40 वाजता बडोदा येथून सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 4.45 वाजता रीवा येथे पोहोचेल तर अप गाडी क्रमांक 20906 रीवा-बडोदा महानमा एक्सप्रेस रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 4.10 वाजता बडोदा येथे पोहोचेल. या गाडीला भरुच, सुरत, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरीया, गाडरवाडा, नर्सिंगपुर, जबलपूर, कटणी, मैयर, सतना या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.