बनावट दस्तावेजाने जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन या ठिकाणी जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून जमीन लाटण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी बेलवंडी येथील तब्बल १३ जनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी स्टेशन या ठिकाणी विजय निवृत्ती जगताप रा बेलवंडी हल्ली राहणार सोनवडी ता दौंड यांनी बेलवंडी गावच्या शिवारात गट न ३०५ व ३१२ मध्ये शेतजमीन होती २६ जून १९९५ ते आजपर्यंत हे बाहेरगावी राहत असल्यामुळे बेलवंडी गावातील मारुती  जगताप, ज्ञानदेव जगताप, जयसिंग जगताप, चंद्रकांत जगताप, विलास मारुती जगताप, भाऊसाहेब जगताप, शैला  जगताप, पोपट  जगताप, दत्तात्रय जगताप, शंकर जगताप,  तुषार जगताप सर्व राहणार बेलवंडी बुद्रुक यांनी तलाठी आर.एस.कदम यास हाताशी धरून जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून जमीन ताब्यात घेऊन लाटण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी विजय निवृत्ती जगताप रा बेलवंडी हल्ली राहणार सोनवडी ता दौंड यांच्या फिर्यादीवरून तलाठ्यासह तब्बल १३ जनावर भादंवि ४२०,४४७,४३७,४३८,४७१,१२०ब प्रमाणे बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर के घुगे हे करत आहेत