बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

0 1

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 रुपयांची दागिने असलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की खंडवा येथील प्रमिला विकास बोंडे वय 52 या दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानकावर खंडवा इथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील लाखांचे दागिने असलेली बाग लांबवली या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप हे करीत आहेत.