बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना मारहाण

0

जळगाव । शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना गुरुवारी रात्री काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. साहित्या यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी पेठ भागातील एका क्लबच्या बाहेर खुबचंद साहित्या यांना काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना तेथून क्लबच्या आतमध्ये नेण्यात आले. तेथेही त्यांच्या तोंडावर बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत साहित्या हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली.