बाजार समिती कामकाज बंद ठेवण्याबाबत प्रशासनाला निवेदन

0

बोदवड- बाजार समिती कर्मचार्‍यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन 28 पासून सुरू होत असून असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाजार समिती कर्मचार्‍यांनी तहसीलदार रवींद्र जोगी यांच्यासह पोलिस निरीक्षकंना निवेदन दिले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ,पणन संघ, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना महितीस्तव निवेदन देण्यात आले आहे. बोदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबजार समिती वरणगावख मुक्ताईनगर, जामठी, कुर्‍हाकाकोडा, अंतुर्ली आदी बाजार समितीचे कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
बाजार समित्यांचे क्षेत्रात खेडा खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली असून बाजार समित्यांचे मुख्य व दुय्यम बाजारपेठेत शेतमाल विक्रीस येणे बंद झाले असून शासनाच्या या सात धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न ना झाल्यामुळे बाजार समिती कर्मचार्‍यांचे वेतन मिळत नाही परीणाम या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर 28 पासून आंदोलनस सहभागी होण्यासाठी कामबंद आंदोलन करणार येणार आहे. निवेदनावर राजेश कालबैले, अरविंद महाजन, संतोष सोनवणे, सुरेश चौहाण, परेश शहा, पंडित कोकाटे, गजानन डांबरे, विकास भालेराव, मदन मिलांडे, विशाल चौधरी, ध्यानेश्वर ढाले, समाधान तेली, संपत पाटील, शैलेंद्र सोनवणे, भागवत कोल्हे, हिंमतसिंग पाटील, संतोष तोरे, सचिन खर्चे, जितेंद्र पाटील आदी कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.