बामणोद शिवारात जुगारावर धाड : आठ जुगारींना अटक

0

बुलेटसह पाच दुचाकी व चारचाकी मिळून सुमारे लाखांचा मुद्देमाल जप्त

फैजपूर : यावल तालुक्यातील बामणोद शिवारात असलेल्या सून सावखेडा मारुती मंदिरा जवळील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फैजपूर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धाड टाकून आठ जुगारींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 12 हजार 700 रुपयांची रोकड 7 लाखाची महागगडी चार चाकी व बुलेटसह 5 मोटार सायकली असा एकूण 9 लाख 13 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जुगार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

संचारबंदीचे उल्लंघण व विविध कलमान्वये गुन्हा
या आरोपींविरुद्ध कोरोना आजारामुळे संचारबंदी लागू असल्याने संचारबंदीचे उल्लंघन तसेच मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी तसेच जुगार खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फार्म हाऊसनजीक सुरू होता अड्डा
बामणोद शिवारातील विनोद पाटील यांच्या शेतातील फार्म हाऊसच्या बाजूला जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, सहाय्यक फौजदार अंबादास पाठरवट हवालदार उमेश पाटील, उमेश चौधरी व प्रशांत चिरमाडे यांनी गुरुवारी रात्री जुगार अड्डयावर धाड टाकली. या धाडीत आठ जुगारींना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यात विनोद प्रभाकर पाटील (रा.भुसावळ), सैय्यद वाहिद सैय्यद रशीद (रा.भालोद), ब्रिजलाल राजाराम कोळी (रा.म्हैसवाडी), अजय आनंदा भोई (रा.भालोद), संजय उर्फ जॉकी तुकाराम सोनवणे (रा.बामणोद), लिलाधर गंभीर कोळी, अनिल रामा कोळी, मंगल छगन पाटील (सर्व रा.म्हैसवाडी) यांचा समावेश होता. या आरोपींकडून रोख रक्कम, एक महागडी चारचाकी, पाच दुचाकी, मोबाईल असा एकूण एकूण लाख 13 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. उमेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट करीत आहेत.