बायको माहेरी अन् कुसूंब्याला आईकडे गेलेल्या पती पर्यवेक्षकाचे घर फोडले

0

कोल्हेनगरातून 36 हजार 800 रुपयांचे दागिणे लांबविले

जळगाव – बायको माहेरी घरी गेली, तोपर्यंत कुसूंबा येथे आईकडे राहण्यास गेलेल्या कंपनी पर्यवेक्षक प्रदीप कडू बाणाईत यांचे कोल्हेनगरातील घर फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरातून 36 हजार 800 रुपयांचे दागिणे लांबविले आहेत.

दिवाळीसाठी पत्नी गेली माहेरी
कोल्हेनगरातील प्लॉट नं 9 येथे प्रदीप कडू बाणाईत हे पत्नी गायत्री व दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. शहरातील साई श्रध्दा पॉलीमर्स या कंपनीत ते सुपरवायजर म्हणून नोकरी करुन उदरनिर्वाह भागवितात. दिवाळीसाठी पत्नी व मुलींसह माहेर रावेर येथे गेली आहे. त्यामुळे प्रदीप बाणाईत हे कुसूंबा येथे तुळजाईनगरात आईकडे गेले होते.

शेजार्‍यांनी फोनवरुन कळविला प्रकार
5 रोजी सकाळी 11 वाजता बाणाईत यांचे शेजारी राखी चित्ते यांना बाणाईत यांचे घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे दिसले. त्यांनी गायत्री बाणाईत यांना प्रकार कळविला. गायत्री यांनी पतीला कळविले. त्यानुसार प्रदीप बाणाईत यांनी कोल्हेनगरातील घर गाठले. पाहणी केली असता बेडरुममधील लोखंडी कपाट उघडे. चोरट्यांनी कपाटातील 8 ग्रॅमची 16 हजार रुपयांची सोन्याची मंगलपोत, 5 ग्रॅमची 10 हजाराची सोन्याची पोत, 5 ग्रॅमचे 10 हजार रुपयांचे कानातले व 800 रुपयंचे लहान मुलांचे चांदीचे दागिणे असा 36 हजार 800 रुपयांचे दागिणे लांबविले. याबाबत बाणाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.