बिबट्याची दहशत कायम

0

कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची दहशत कायम आहे. पाळीव प्राण्यांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांमुळे नागरिक धास्तावले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बेट भागातील जांबूतमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 4 शेळ्या व 4 करडे ठार झाले. यामध्ये संजय पोपट सोनुले या शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जांबुत येथील सोनुले हे शेळ्यापालनाबरोबरच इस्री व्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करीत आहेत. वनविभागाने त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची तसेच बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनपाल चारूशीला काटे व वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.