बिबट्याची मादी जेरबंद

0

ओतूर : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे बिबट्याची मादी पिंजर्‍यात जेरबंद झाली. रविवारी वडगाव कांदळी परिसरात किरण सावळेराम घाडगे यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. साडेतीन वर्षे वयाची ही मादी सकाळी पहाटे पाच वाजता जेरबंद झाली. तिला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ही कार्यवाही उपवनसंरक्षक गौडा व सहायक वनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपाल एस. आर. खट्टे, वनरक्षक के. जी. भालेराव, वनरक्षक ए. डी. तंगडवार, वनसेवक भोर, वामन व गुळवे यांनी केली. विशेष सहकार्य विशाल रेपाळे, मयूर घाडगे, गणेश घाडगे, अमोल गुंजाळ, नामदेव गोपाळे यांचे लाभले.