बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

0

दौंड : केडगाव येथील धुमळीचा मळा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार करडांसह एक शेळी ठार झाली असून, एक गंभीर जखमी आहे. धुमळीचा मळा या ठिकाणी विनायक जयसिंग राऊत यांच्या घरासमोर असणार्‍या गोठ्यात शिरून बिबट्याने हा हल्ला केला. मागील काही दिवसांपासून केडगाव-भांडगाव परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे, त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. रात्री-अपरात्री बाहेर पडताना काळजी घ्यावी लागत आहे, त्यामुळे वनविभागाने केडगाव या ठिकाणी चार दिवसांपूर्वी पिंजरा लावला असला तरी बिबट्याने त्याला हुलकावणी देऊन विनायक राऊत यांच्या घरासमोर असणार्‍या गोठ्यात शिरून चार करडे आणि एका शेळीचा फडशा पाडला.