बीसीसीआयच्या वार्षिक करारातून धोनी बाद !

0

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वर्षभरापासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत. आता बीसीसीआयने गुरुवारी ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वार्षिक करारातील खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यात धोनीचे नाव वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या करारात मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांना स्थान देण्यात आले आहे. ए+ ग्रेड – 7 कोटी, ए ग्रेड – 5 कोटी, बी ग्रेड – 3 कोटी’ सी ग्रेड – 1 कोटी असे मानधन देण्यात येत असते.

ग्रेट निहाय खेळाडू
ए + ग्रेड – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ए ग्रेड – रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेस्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत
बी ग्रेड – वृद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल
सी ग्रेड – केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर