बी.एस.पी.फाँऊडेन तर्फे करमाडी गावात अन्नदान

0

असलोद (प्रतिनिधी)- असलोद येथील बी.एस.पी.फाँऊडेन तर्फे करमाडी या आदिवासी गावात अन्नदान म्हणुन सर्व गावातील नागरिकांना जलेबी व मसाले भात घरोघरी व काही लोकांना एक मिटर अंतरावर बसुन जेवन देण्यात आले यावेळी बी.एस.पी.फाँऊडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.यावेळी शासनाने कोरोनो व्हायरसच्या बचावासाठी जे नियम सुचविले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

सध्या सर्व भारतभर कोरोनो व्हायरसचा प्ररसार होत आहे कोरोणो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केद्रशासनाने व राज्य शासनाने एकवीस दिवसाच्या लाँकडाऊनची घोषना केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रोजदारीने काम करणारे मजुर घरीच बसुन आहेत अशा परिस्थिती शहादातालुक्यातील करमाडी गावात देखील सर्व आदिवासी रोजदारीने कामाला जाणारे लोक घरीच बसुन आहेत शासनाने दिलेल्या आदेशाचे पुर्णपणे पालन करित आहे अशा परिस्थिती या आदिवासी वस्तीच्या लोकाना बि.एस.पी.फाऊडेश तर्फे सर्व गावाला एक वेळ जेवन देण्यात आले यात काही लोकांनी एक मिटर अंतर ठेऊन एकाच ठिकाणी जेवन केले व काही कुटुबांना घरपोच अन्नधान करण्यात आले.यावेळी गावात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली लोकांनी देखील गर्दी न करता अंतरावर उभे राहीले व प्रत्येकाने नियोजन पध्दतीने सहकार्य केले यावेळी गावातील प्रतीष्ठीत मंडळींनी देखील मोठे सहकार्य केले.