बोदवडला पतीने पत्नीला फाशी देऊन मारले

1

आरोपी भुसावळ पोलिसात हजर ; कारण गुलदस्त्यात

भुसावळ- बोदवड शहरातील विवाहितेला पतीनेच फाशी देऊन मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने बोदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली. शमानाबी असलम शेख (32) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आरोपी पती असलम शेख हा मजुरीचे काम करतो. पती-पत्नीमध्ये नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून खटके उडत असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आरोपी पती असलमने पत्नीशी भांडण करीत तिचा गळा आवळून गळफास दिला व भुसावळ गाठले. संशयीत दुपारपर्यंत भुसावळात भटकत राहिला व दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याने भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठून झाल्या कृत्याची माहिती दिल्याने घटनेचा उलगडा झाला. मयत विवाहितेच्या पश्‍चात दोन वर्षांची जुळी मुले आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश भामरे व सहकार्‍यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.