बोदवड बसस्थानकावर अनोळखी इसमाचा थंडीमुळे मृत्यू

0

बोदवड : शहरातील बसस्थानकावर सोमवारी सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. याबाबत परीवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अशोक नारायण वाणी यांनी बोदवड पोलिस स्टेशनला माहिती कळवली. मृत इसमाच्या खिशात महाराष्ट्र शासनाचे अपंगत्वाचे ओळखपत्र आढळले. पोलिस कर्मचारी कालिचरण बिर्‍हाडे, संदीप वानखेडे, गजानन जोशी यांनी त्वरीत बाळापूर पोलिस स्थानकात संपर्क केला असता कासारखेडा येथील मंगेश खारोळे यांनी मयत इसम त्याचे मामा असल्याचे सांगितले. गोवर्धन कांशीराम साबळे (65, कासारखेडा, ता.बाळापूर, जि.अकोला) असे मृताचे नाव निष्पन्न झाले आहे. मयत साबळे हे तीर्थक्षेत्र फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाले मात्र अतिथंडीमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज आहे. मुक्ताईनगर शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास कालीचरण बिर्‍हाडे, संदीप वानखेडे, गजानन जोशी करीत आहेत.