बोदवड शहरातून दुचाकी लंपास

0

बोदवड- शहरातील कोटेचा नगर भागातील रहिवासी प्रफुल्लकुमार मुरलिधर पाटील (बोदवड) यांच्या राहत्या घराबाहेर लावलेली 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डीएफ 7723) अज्ञात चोरट्यांनी 28 ते 1 मार्चदरम्यान लांबवली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विलास महाजन करीत आहेत.