Sunday , March 18 2018

बोनी कपूर यांना क्लीनचिट

श्रीदेवी मृत्यूप्रकरण

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईतील हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्यांच्या मृत्यूबाबत अजूनही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना श्रीदेवींच्या कुटुंबीयांनी क्लीनचिट दिली आहे. काही दिवसांपूर्वी वेणूगोपाल रेड्डी या श्रीदेवींच्या नातेवाईकाने बोनी कपूर यांच्यावर संशय व्यक्त केला होता. तसेच श्रीदेवी प्रचंड तणावाखाली होत्या असे म्हटले होते. या रेड्डींचे आरोप खोटे असल्याचेही श्रीदेवीच्या जवळच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

बहिण श्रीलता, संजय रामास्वामींकडून समर्थन
चेन्नईत श्रीदेवी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीदेवी यांची बहिण श्रीलता आणि त्यांचे पती संजय रामास्वामीही उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय यांनी बोनी कपूर यांचे समर्थन केले. श्रीलताबरोबर लग्न होऊन 28 वर्ष झाली आहेत. एवढ्या वर्षात कोणत्याही वेणूगोपाल यांचे नाव मी ऐकले नाही. आम्ही सध्या दुःखात आहोत. त्यामुळे आम्ही श्रीदेवींच्या निधनावर गप्प राहण्याचे ठरवले आहे. वेणूगोपालच्या म्हणण्यात तथ्य नाही. आम्ही बोनी कपूर यांच्या पाठिशी आहोत, असे सांगत संजय यांनी बोनी कपूर यांना क्लीनचिट दिली आहे.

श्रीदेवी यांची बरीच संपत्ती विकली
श्रीदेवी यांचे निकटवर्तीय वेणूगोपाल रेड्डी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूर यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केला होता. बोनी कपूर आर्थिक चणचणीत होते. अनेक चित्रपट फ्लॉप गेल्याने त्यांना तोटा झाला होता. त्यामुळे बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांची बरीच संपत्ती विकली होती. मालमत्ता विकल्याने श्रीदेवी दुःखात होत्या, असे सांगत वेणूगोपाल रेड्डी यांनी श्रीदेवी यांच्या मृत्युला बोनी कपूर यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले होते.

हे देखील वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *