बोपखेलमध्ये  साडेतीन एकर जागेत साकारणार उद्यान

0 1
पिंपरी- विविध विकास कामांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होत आहे. या विकासातूनच स्मार्ट शहर करण्याचा प्रयत्न असल्याचे, मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 4 मधील बोपखेल येथे विकसित करण्यात येणा-या उद्यानाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरसदस्य विकास डोळस, लक्ष्मण उंडे नगरसदस्या हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी नगरसदस्य भाऊसाहेब सुपे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

महापौर राहूल जाधव म्हणाले, बोपखेल गावाकडे दूर्लक्ष होणार नाही. बोपखेलवासियांचा जिव्हाळ्याचा ज्वलंत प्रश्न पूलाचा आहे. सुमारे 53 कोटीची निविदा काढण्यात आली होती. परंतू निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने काम करता आले नाही. परंतू, निवडणूकीनंतर लगेच पूलाचा प्रश्न सोडविणेत येईल असेही ते म्हणाले.

नगरसदस्य विकास डोळस म्हणाले, ”दोन वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 100 कोटींची विविध विकासकामे दिघी बोपखेल या भागासाठी मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच पूलाचे काम सुरु होईल. या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबध्द आहोत”. नगरसदस्या निर्मला गायकवाड म्हणाल्या, ”पाण्याच्या टाकीचे काम शाळा आदी विकास कामे नागरीकांच्या सहकार्याने केली आहेत. यापुढेही आम्ही नागरीकांसाठी सदैव तत्पर आहोत”. नगरसदस्य लक्ष्मण उंडे म्हणाले, ”दिघी बोपखेल या भागासाठी सर्व सदस्यांनी एकत्र प्रयत्न केले आहेत. यापुढेही एकत्र येवून विकासकामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. नगरसदस्या हिराबाई घुले यांनीही मनोगत व्यक्त केले.

सुमारे 3.21 एकर मध्ये उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये 450  मीटर लांबीचा व 2 मीटर रुंदीचा पाथवे, चिल्ड्रेन प्ले एरिया, लॉन एरिया,टॉयलेट,पार्किंग, ओपन जिमसाठी जागा व रिव्हर फ्रंट सिटींग करण्यारत येईल प्रकल्पास सुमारे 3 कोटी 34 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नोव्हेंबर 2020 अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे बोपखेल परिसरातील नागरीकांना याचा लाभ होणार आहे.