ब्यूटीशीयन होता येत नाही म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या 

0
कासारवाडी- ब्यूटीशीयन होता येत नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कासारवाडी येथे सोमवारी (दि. 4) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रियंका किशोर शेवाळे (वय 15, रा. कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास प्रियंकाची आई शेजारी गेली. तिची लहान बहीण घरात झोपली होती. तिचे वडील कामावर गेले होते. त्यावेळी तिने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आई बाहेरुन घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रियंकाने “मला ब्यूटीशीयन होता येणार नाही” अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली. भोसरी पोलीस तपास करीत आहे.