भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

0

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

जळगाव। कोरोना महामारीमुळे 4 ते 6 एप्रिल तीन दिवसीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी घर बसल्या सर्वानी एकच वेळी जन्मकल्याणक साजरा करण्यात यावे, यासाठी 6 एप्रिल रोजी श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नवकार महामंत्र जाप आणि महावीर भगवानची प्रतिमा सजावट जिल्हास्तरीय घर बसल्या प्रतियोगिता घेण्यात आली.याला जिल्हातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यातील 51लोकांना पारितोषिक देण्यात येईल. तसेच या निमित्त कोरोना महामारीमुळे लॉकडाउन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रेडक्रॉस सोसाइटीने आम्हाला सेवा देणारे महानगरपालिकातर्फे सेवा देणारे जलगांव शहरातील साफसफाई कर्मचारी तसेच घंटागाड़ी चालवणारे सर्व कर्मचारी याना संस्थेतर्फे 1100 मास्क वाटप करण्यात आले.


ही संकल्पना प्रसन्न रेदासनी व त्यांची रेडक्रॉस सोसाइटीची टीम मिळून संस्थेमार्फत हे कार्य करण्यात आले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष दर्शन टाटिया, सचिव रितेश छोरियां, कोषाध्यक्ष पियुष संघवी,आनंद चाँदीवाल, मनोज लोढा, प्रविण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रविण छाजेड़,पारस कुचेरिया, अल्पेश कोठारी, सुशील छाजेड़, पूर्वेश शाह यांनी परिश्रम घेतले.