भरधाव अ‍ॅपेची कारला धडक, महिला प्रवासी ठार

0 1

12 प्रवासी जखमी ; आमोद्याजवळ अपघात

फैजपूर- फैजपूरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येत असलेली प्रवासी अ‍ॅपे रीक्षा समोरून येणार्‍या कारवर आदळून झालेल्या अपघातात महिला प्रवासी जागीच ठार झाली तर अन्य 12 प्रवासी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आमोद्याजवळ झाला. या अपघातात सुनीता प्रकाश भंगाळे (50, चिनावल) या जागीच ठार झाल्या.
ट्रॅक्टर येत असताना

धडकेनंतर अ‍ॅपे रीक्षा उलटली
गायत्री गतीसिंग परदेशी (30, बर्‍हाणपूर), निर्मला विकास झांबरे (45, भुसावळ), निर्मला विकास बेलदार (45, कुंभारखेडा), वंदना कैलास बेलदार (45, कुंभारखेडा), भागवत इंगळे (45, सिंगत) यांच्यासह अन्य 12 प्रवासी जखमी झाले. भरधाव अ‍ॅपे रीक्षा (एम.एच.19-8451) व कार (एम.एच.19 ए.पी.1263) मध्ये धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की अ‍ॅपे रीक्षा धडकेनंतर तीन ते चार वेळा रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातग्रस्त कारमध्ये जळगावचे वर्‍हाड लग्नाला जात असल्याचे सांगण्यात आले. जखमींना गोदावरी तसेच अन्य खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.