भर रस्त्यात चार कारचा अपघात

0
पिंपरी-चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थांबली. रस्त्यात अचानक कार थांबल्याने मागून आलेल्या तीन कार एकमेकांना धडकल्या. ही घटना आज (सोमवारी) दुपारी तीनच्या सुमारास वल्लभनगर येथे घडला.
पिंपरी कडून पुण्याच्या दिशेला जाणा-या मार्गावरून जाताना एका वॅगन आर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार जागेवर थांबली. त्यावेळी मागून येणा-या इतर तीन कार एकमेकांना धडकल्या. चारही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत धडकलेल्या कार बाजूला घेतल्या. दरम्यान रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.