भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी २६-१३ चा फॉर्म्युला !

0

मुंबई: विधानसभा निवडणूक झाली असून अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. भाजप-सेनेची युती झाली असताना मुख्यमंत्री कोण होणार यावर सत्ता स्थापनेचा घोडा अडून पडला आहे. आज भाजपची विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी बैठक सुरु आहे. दरम्यान सत्ता स्थापनेबाबत भाजपने शिवसेनेला २६-१३ चा फॉर्म्युला दिल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री पद आणि इतर मंत्रीपद शिवसेनेला देण्याबाबत भाजपची तयारी असल्याचे बोलले जात आहे. तसा प्रस्ताव देखील शिवसेनेला पाठविण्यात आला असल्याची चर्चा आहे. १३ मंत्री पदे शिवसेनेला देण्याबाबत भाजपने तयारी दाखविली आहे.