भाजपच्या पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव !

0

मुंबई: भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधीमंडळ पक्षनेता आज बुधवारी ३० रोजी ठरणार आहे. दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. भाजप आमदारांची बैठक सुरु झाली आहे. दरम्यान भाजपकडून पक्षनेते पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार आहे. सध्या बैठक सुरु असून थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा होणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहे, केवळ औपचारिक घोषणा होणार आहे.

भाजपचे आमदार भगवे फेटे घालून विधानभवनात उपस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठक सुरु झाली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्यासह १० आमदारांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले आहे.