BREAKING: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील !

0

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यानंतर भाजपने पक्षांतर्गत बदलाला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पदही बदलणार असे बोलले जात होते. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई भाजपा अध्यक्षपदाची मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चंद्रकांत पाटील यांच्या नावासाठी आग्रही होते.