भाजपला दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य भोवले; भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वैयक्तिकरित्या दहशतवादी असल्याचे आरोप झाले. भाजप नेत्यांनी केलेले वादग्रस्त जनतेला खपले नाही, म्हणूनच दिल्लीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वादग्रस्त वक्तव्य पक्षाला त्रासदायक ठरल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कबुली दिली आहे. दरम्यान भाजप अध्यक्षांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात गिरीराज यांनी शाहीन बाग आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. शाहीन बाग मधील आंदोलन आता आंदोलन राहिले नसून येथे सुसाईड बॉम्ब तयार केले जात आहेत. देशाच्या राजधानीत देशाविरुद्ध योजना बनविली जात आहे. शाहिन बागेत एका महिलाचा मुलगा थंडीने मृत्यूमुखी पडला. मात्र ते त्याला शहीद म्हणत आहेत. हा सुसाईड बॉम्बच आहे, असे गिरीराज म्हणाले होते.