भाजपात प्रवेश करणार नाही: सचिन पायलट यांचे स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली: राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काल बंडाचा झेंडा हाती घेतल्याने कॉंग्रेससह मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची डोकेदुखी वाढली आहे. सचिन पायलट भाजप नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले असून भाजपात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

सचिन पायलट यांच्या या विधानामुळे आता कॉंग्रेस सरकार टिकणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.