भाजपा कार्यकर्त्यांनी बुथ जीतो देश जीतो अभियान राबवावे- संघटन मंत्री रवि अनासपुरे

जामनेर प्रतिनिधी- संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणावर काम असून आपण सर्वांनी बुथवर जाऊन बैठका घ्याव्या व सर्व सामान्य जनते पर्यंत भाजपाचे विचार पोहोचवावे असे प्रतिपादन जामनेर येथे झालेल्या बैठकीत बोलताना भाजपा संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी केले. जामनेर येथील बाबाजी राघव मंगल कार्यालयात तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक भाजपा संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे सरचिटणीस सचिन पाटील भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर संघटक नवल पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, अ‍ॅड. शिवाजी सोनार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम निकम, शेखर काळे, रवींद्र झाल्टे उपस्थित होते. रवि अनासपुरे आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शनात सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारने विविध योजना गोरगरीब जनतेसाठी राबवल्या असून आपण सर्वांनी गावागावात याबाबत माहिती दिली पाहिजे. त्याचबरोबर भाजपा पदाधिकार्‍यांसोबत बूथ प्रमुख पेज प्रमुख यांनी योग्य ते काम करून भाजपा सदस्य वाढवावे. येत्या काही दिवसात संपूर्ण तालुक्यातील ३२४ बुधवार भारतीय जनता पार्टीची बैठक करून येणार्‍या भारतीय जनता पार्टी स्थापना दिनी गावागावात ध्वज फडकवा, रांगोळ्या काढा त्यामुळे सर्वदूर वातावरण निर्मिती होईल. येणार्‍या निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपाचे उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही त्यांनी बैठकीत बोलताना दिली.