भाजप – शिवसेना युतीचा १८ मार्च रोजी पुण्यात मेळावा

0

पुणे : भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात दोन्ही पक्षातील पदाधिकार्‍यांचे मेळावे घेतले जाणार आहेत . त्यातील पहिला मेळावा दि. १८ मार्च रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यासाठी पुणे, सोलापूर, बारामती, माढा, शिरुर, मावळ, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या मेळाव्याला अपेक्षित आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील युतीचे सर्व मंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य हे विशेष निमंत्रित असणार आहेत.