भानखेडा येथे पोलिसांच्या फिरत्या पथकाची भेट

0

भुसावळ – तालुक्यातील भानखेडा गावातील पोलिसांच्या फिरत्या पथकाने भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच त्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले. नूतन उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे निरीक्षक अरुण हजारे, सहाय्यक फौजदार सुरेश वैद्य यांनी मार्गदर्शन केले. सरपंच पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामसिंग मोरे, ग्रामपंचायत सदस्या रेखा सोनवणे, शिक्षक सेना प्रादेशिक सचिव सुधीर तायडे, नाईक पोहेकर, कॉन्स्टेबल गणेश सोनवणे, कॉन्स्टेबल राजू काझी, महिला होमगार्ड रेखा सावळे, महिला होमगार्ड उषा नरवाडे, होमगार्ड शांताराम सोनवणे, पोलीस पाटील शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.