भानखेड्यात आचारसंहितेनंतरही राजकीय फलक उघडेच

0

आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

बोदवड- लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी झाल्यानंतरही बोदवड तालुक्यातील भानखेडा फलक झाकण्यात न आल्याने आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने सुज्ञ नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी गावातील विविध राजकीय पक्षांचे फलक झाकणे बंधनकारक असतानाही भानखेडा येथे मात्र फलक उघडेच असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

तहसील प्रशासन कारवाई करणार
भानखेडा येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा ,शिवसेना आदी पक्षांचे कार्यकर्ते आहे.. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील विविध राजकीय फलक झाकणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात कृती न केल्याने संताप व्यक्तहोत आहे. तहसीलदार रवींद्र जोगी यांच्याशी संपर्क साधला असता आचारसहितेचा भंग होईल अशा प्रकारचे राजकीय फलक आढळल्यास प्रशासन चौकशी करून कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले.