भारताकडून समस्त अमेरिकन जनतेचा सन्मान: ट्रम्प सत्काराने भारावले !

0

अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज सोमवारपासून दोन दिवशीय भारत दौऱ्यावर आहेत. सकाळी हमदाबाद विमानतळावर ट्रम्प पत्नी आणि मुलीसह भारतात दाखल झाले. त्यानंतर ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी महात्मा गांधी यांच्या चरखेवर बसून चरखा चालविला. याठिकाणी त्यांनी आपल्या हस्ताक्षरात अभिप्राय देखील नोंदविला. नंतर आता डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटनाला पोहोचले आहे. त्याठिकाणी १ लाख १० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमचे उद्घाटन केले.

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सच्चे मित्र आहे अशा शब्दात ट्रम्प यांनी भाषणाची सुरुवात केली. भारतात अमेरिकन नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळाली. भारतीयांनाही तीच वागणूक अमेरिकेत मिळत आहे.

मोदी हे फक्त गुजरातचे गौरव नसून संपूर्ण देशाचे ते गौरव आहे असे गौरोद्गार ट्रम्प यांनी यावेळी मोदींबद्दल काढले.

भारतीय जनेतेने आमचे इतके भव्य स्वागत केले आहे, ते आम्ही काहीही विसरणार नाही.

मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे झाली आहेत. गरिबी कमी करण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. दारिद्र्य रेषेखालील जनतेला रेषेच्या वर आणण्यासाठी मोदींनी केलेल्या कामाचे ट्रम्प यांनी कौतुक केले.