भारताचा ‘सुपर’ विजय; ऐतिहासिक कामगिरी करत मालिका खिशात !

0

हॅमिल्टन: आज बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये तिसरा टी-२० सामना झाला. अतिशय रोमहर्षक आणि उत्सुकता वाढविणारा हा सामना होता. सुपरओव्हरचा हा सामना होता. सुपरओव्हरमध्ये रोहित शर्माने ठोकलेल्या सलग दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारताला १८ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. भारताने न्यूझीलंडसमोर १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. हा सामना टाय झाला. त्यामुळे सुपर ओव्हर झाली.

अशी झाली सुपर ओव्हर:

पहिल्या चेंडूवर दोन धावा
दुसऱ्या चेंडूवर एक धाव
तिसऱ्या चेंडूवर चौकार
चौथ्या चेंडूवर पुन्हा एक धाव
पाचव्या चेंडूवर षटकार, विजयासाठी १ चेंडूत ४ धावा
अखेरच्या चेंडूवर रोहितचा षटकार आणि भारत विजय