भारतीय अर्थव्यवस्थेत लवकरच सुधारणा होईल: आयएमएफ

0

वॉशिंग्टनः देशातील अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय मुद्राकोष (आयएमएफ) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल असे विधान केले आहे. या वक्तव्यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतातील अर्थव्यवस्थेत घसरण झाली हे जरी खरे असले तरी भारतात मंदी आली आहे, यात काहीच तथ्य नाही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०१९ मध्ये आर्थिक सुधारणांसाठी करण्यात आलेल्या जीएसटी आणि नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतात सध्या जी आर्थिक व्यवस्था दिसत आहे. ती आर्थिक मंदी आहे, असे म्हणता येणार नाही, असे क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या. भारतातील आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलले जात आहे. परंतु, याचे परिणाम दीर्घ काळासाठी असणार आहेत.

मोदी सरकार जे पावलं उचलत आहेत. त्याचे तात्काळ परिणा उमटतील असे नाही. भारतीय अर्थव्यवस्था ने वास्तविक २०१९ मध्ये अचानक पणे मंदी अनुभवली. क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अर्थविषयक माहिती देताना सांगितले की, २०२० मध्ये ५. ८ टक्के (विकास दर) आणि नंतर २०२१ मध्ये ६.५ टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.