• Login
ePaper
Janshakti Newspaper
Saturday, January 16, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!

    जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    ६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    देवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार

    जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध

    दुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान

    नंदुरबार नगरपालिका निवडणूक खासदार व तिनही आमदारांनी केली प्रतिष्ठेची

    ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले

    वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    जवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result
Janshakti Newspaper
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे मळभ

18 May, 2019
in अर्थ, आंतरराष्ट्रीय, खान्देश, लेख, विशेष
0
भारतीय अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे मळभ
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाने गंभीर वळण घेतले असून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही अनिश्चिततेचे मळभ दाटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेत येणार्‍या १४ लाख कोटी रुपयांच्या मालावरील आयात शुल्कात वाढ करून ते १० टक्के वरून २५ टक्के केले. याच्या प्रत्युत्तरादाखल चीननेही अमेरिकेतून येणार्‍या जवळपास ४ लाख कोटी रुपयांच्या मालावरील आयात शुल्कात १ जूनपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या भुमिकेमुळे जागतिक व्यापार संघटनेची नियमबद्ध चौकट खिळखिळी होईल. अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध वेळीच न थांबल्यास जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी आणि वित्तीय बाजारासाठी ती खूप मोठी जोखीम असेल. एकीकडे अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्तांमधील व्यापारयुद्धाची झळ भारताला बसण्याची चिन्हे असतांना दुसरीकडे बँकांचे ९६००० कोटी कर्ज थकवून गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) ही सरकारी कंपनी आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. याचे हादरे भारतीय अर्थव्यवस्थेला जाणवू लागले आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात जागतिक पातळीवर मुक्त व्यापार हा चलतीचा शब्द होता. आयात कर कमी करून आणि व्यापारावरचे निर्बंध सैलावून कार्यक्षमता आणि समृद्धी वाढीला लागेल, या गृहीतकावर जवळपास सर्वसंमतीचे चित्र होते. मात्र या सर्व समावेशक संकल्पनेला हरताळ फासत एकमेकांवर आयातशुल्क लादत व्यापारयुध्दाचा नवा ट्रेंड अलीकडच्या काही वर्षात पहायला मिळत आहे. यात अमेरिका व चीन या दोन महासत्ता आघाडीवर आहेत. २०१६मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवितानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला होता आणि सत्तेवर येताच त्यांची पावले त्या दिशेने पडू लागली. अमेरिकेतल्या लोकांचे रोजगारे परक्यांमुळे जात आहेत. इतर देशांना सवलती दिल्यामुळे अमेरिकी उद्योगांचे नुकसान होत आहे, अशी समीकरणे मांडायला त्यांनी सुरवात केली. एकूणच जगभर खुल्या अर्थव्यवस्थेचा डंका पिटणार्‍या देशानेच दुसर्‍यांसाठी आपली कवाडे बंद केली. अमेरिकेच्या सर्वात वादग्रस्त अध्यक्षांच्या यादीत अव्वलस्थानी असणारे ट्रम्प यांनी चीनकडून येणार्‍या अ‍ॅल्युमिनियम, पोलादावर मोठे आयातशुल्क लादून व्यापारयुद्धाचे बिगूल वाजवले. मग चीननेही अमेरिकी वस्तू-उत्पादनांसाठी आपली दारे बंद करण्याचा आणि अमेरिकी उत्पादनांवर आयातशुल्क वाढविण्याचा सपाटा लावला. अमेरिकेला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतासह कॅनडा व युरोपीय महासंघानेही तेवढ्याच रकमेच्या अमेरिकी आयातीवर कर लादण्याची घोषणा केल्याने व्यापरयुध्दाचा भडका उडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेचा हा आडमुठेपणा नवा नाही १९७० आणि ८०च्या दशकांत अमेरिका जपानपुढे अशा मागण्या ठेवत असे, यामुळे जपानला ‘प्लाझा अकॉर्ड’सारख्या करारावर अपरिहार्यपणे स्वाक्षरी करणे भाग ठरले होते. अमेरिका व चीनमधील हेे व्यापारयुध्द खरे तर भारतासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते, अशी शक्यता काही तज्ञांकडून वर्तविण्यात येत असली तरी, चीनमधून बाहेर पडणार्‍या अमेरिकी कंपन्या भारतात येत नाहीत. त्या थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम आदी देशांकडे जात आहेत. गेल्या काही वर्षात भारताच्या बाजारपेठेला चीनी ड्रॅगनचा विळखा घट्ट झाला आहे. जगातील सर्वच देशात कमी किमतीमध्ये वस्तू विकून बाजार पेठेतील अन्य सर्व स्पर्धकांना संपविण्याचे, त्या त्या देशातील बाजारपेठ काबीज करण्याचे डावपेच चीन करतो आहे. भारत हे अनुभवतो आहे. चीनच्या निर्यातीवर परिणाम झाला, तर अन्य देशांना निर्यात करण्यास वाव मिळण्याची शक्यता असली तरी भारताच्या निर्यातवाढीचे प्रमाण अवघे साडेतीन टक्के होईल, असेही तज्ज्ञांचे मत आहे. यापार्श्‍वभुमीवर भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान स्थितीत असल्याची जाणवी होते. हे संकट काय कमी असतांना आता आयएल अ‍ॅण्ड एफएस ही सरकारी कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर निघाली आहे. आयएल अ‍ॅण्ड एफएसकडे असलेल्या ९६००० कोटींपैकी २० सरकारी बँकांचे कर्ज ५८००० कोटी आहे. या बँकांचा एनपीए नऊ लाख कोटींपर्यंत पोहचला आहे. या रकमेत अजून ५८००० कोटींची भर पडली तर सर्वच सरकारी बँका अडचणीत येतील म्हणून एनसीएलटीने बँकांना कर्ज एनपीए घोषित करण्यास मनाई केली होती. त्यावर बँकांनी अपील केले म्हणून आता एनसीएलएटीने ही बंदी उठवली आहे. त्यामुळे आता बँका एनसीएलटीमध्ये अर्ज करून आयएल अ‍ॅण्ड एफएसला दिवाळखोर घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. कंपनीला दिवाळखोर घोषित करून कंपनीची मालमत्ता लिलाव करून कर्जफेड केली जाते. आयएल अ‍ॅण्ड एफएसबाबत मात्र असे करणे योग्य होणार नाही. याचे कारण आयएल अ‍ॅण्ड एफएस बुडली तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या जवळपास २६० उपकंपन्या आहेत व त्यामध्ये जवळपास ६०,००० कर्मचारी आणि लाखो मजूर कामावर आहेत. आयएल अ‍ॅण्ड एफएसला टाळे लागल्यावर हजारो पायाभूत सोईसुविधा प्रकल्प अर्धवट राहतील, लाखो कर्मचारी व कामगार बेकार होतील. यामुळे आयएल अ‍ॅण्ड एफएस बुडणे देशाला परवडणारे नाही. या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरु असतांना माजी केंद्रीय वित्तमंत्री पी.चिदंबरम यांच्या एका विधानाने संशयकल्लोळ वाढला आहे. आर्थिक कामकाज मंत्रालय व अर्थ मंत्रालय यांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीबाबत एक प्रगतीपुस्तक तयार केले त्यात नोटाबंदीनंतरच्या काळातील आकडेवारी आहे. याचा दाखला देत ते म्हणाले की, वास्तव सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढ २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षांत ८.२ टक्क्यांंवरून ७.२ टक्क्यांवर व नंतर ७ टक्क्यांंवर आली. २०१८-१९च्या चौथ्या तिमाहीत हा आर्थिक विकास दर हा ६.५ टक्क्यांंपर्यंत खाली आला. यातील तांत्रिक क्लिष्टता सोडली तरी हा विषय गंभीरच आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT
SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

वैद्यकीय प्रवेशाचे आ‘रक्षण’ कोण करणार!

Next Post

प्रचार संपल्यानंतर मोदी पोहोचले केदारनाथच्या दर्शनाला; करणार ध्यान

Related Posts

धुळ्यात आजी-माजी आमदारांनी केले मतदान!
खान्देश

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान

15 Jan, 2021
जिल्ह्यात 19 हजार 983 अर्ज वैध
खान्देश

६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान

15 Jan, 2021
Next Post
प्रचार संपल्यानंतर मोदी पोहोचले केदारनाथच्या दर्शनाला; करणार ध्यान

प्रचार संपल्यानंतर मोदी पोहोचले केदारनाथच्या दर्शनाला; करणार ध्यान

सरंक्षण क्षेत्रातील लॉबिंग  देशासाठी घातक

सरंक्षण क्षेत्रातील लॉबिंग देशासाठी घातक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group