भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद !

0

नवी दिल्ली: आज एनआरसी आणि सीएए, ईव्हीएमविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, औरंगाबाद शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला आहे. मुंबईत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विलंबाने होत आहे.