भारत बंद: धुळे, जळगावात बंदला गालबोट !

0

मुंबई: आज एनआरसी आणि सीएए, ईव्हीएमविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, औरंगाबाद शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला आहे. मुंबईत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विलंबाने होत आहे.

दरम्यान भारत बंदला हिंसक वळण लागले आहे. जळगावात दुकानावर दगडफेक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात देखील तणाव निर्माण झाला आहे. शिरपुरला बसवर दगडफेक करण्यात आली, यात एक जण जखमी झाला आहे. धुळ्यात टायर जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

औरंगाबाद, यवतमाळ, मुंबईत बस रोखण्यात आल्तयाने णावाची स्थिती निर्माण झाली आहे.