Friday , February 22 2019

भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो; मल्ल्याचे खळबळजनक विधान

लंडन-भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्याने आज ब्रिटेनच्या न्यायालयात धक्कादायक विधान केले आहे. मी भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो असा खळबळजनक व्यक्तव्य मल्ल्या यांनी केले आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार करण्यात आल्याचा व्हिडीओ कोर्टात दाखवला. मात्र, तत्पूर्वी हा व्हिडीओ कोर्टात न दाखविण्याची विनंती विजय मल्ल्याच्या वकिलांनी केली होती. तर देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो, अशी कबुली मल्ल्याने कोर्टात दिली.

भारतीय बँकांचे आपण कुठलिही फसवणूक केली नसून किंगफिशरचे डबघाईला येणे हे व्यवसायिक अपयश आहे. तसेच मल्ल्या किंवा किंगफिशरने वाईट हेतुने बँकाकडे कर्जपुरठ्यासाठी अर्ज केल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे मल्ल्याच्या वकिलांनी कोर्टात म्हटले आहे. तर मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असे विजय मल्ल्याने आज कोर्टात म्हटले.

दरम्यान, भारतीय तुरुंगांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करू नये, अशी मागणी मल्ल्याच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर, न्यायाधीशांनी भारतातील ऑर्थर रोड तुरुंगाचा व्हिडीओ मागितला होता.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!