ADVERTISEMENT
नवी दिल्ली। कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवारच्या मध्यरात्री 12 वाजेपासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात येत असल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा कालावधी 21 दिवसांचा असेल (3 आठवडे) असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या दरम्यान लोकांना घराबाहेर निघण्यास मनाई असेल. देशात जिथे असाल, तिथेच थांबा असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.