भालगाव फाट्यानजीकचा बेकायदेशीर बायोडिझेल पंप सील

एरंडोल:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत पातरखेडा गावासमोर भालगाव फाट्यानजीक असलेल्या अनधिकृत बायोडिझेल पंप शुक्रवारी पुरवठा यंत्रणेतर्फे सील करण्यात आले आहे.
जवळपास सहा महिन्यापासून हे बायोडिझेल पंप अनधिकृतपणे सुरू होता. याबाबत टाकरखेडयासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना हे पंप सील करण्याबाबत सूचना केली होती. जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकार्‍यांना निर्देश दिलेहोते. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल तहसील कार्यालयात याबाबत सूचना केली. यावरून शुक्रवारी पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंपावर जाऊन पंप सील केले. या पंपामुळे पातरखेडे गावाला जीवित हानी होण्याचा धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते.