भालोदला विद्यार्थिनीची छेडखानी ; 9 जणांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा

0

फैजपूर- भालोद येथे दहावी परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींची कॉपी घेऊन येणार्‍या विद्यार्थ्यांची तसेच त्याच्या सोबतच्या त्याच्या मित्रांनी छेडखानी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. भालोद येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे शुक्रवारी इयत्ता 10 वीचा भूगोल या विषयाचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर भालोद येथील सिद्धार्थ भालेराव हा पेपर देत असलेल्या विद्यार्थिनीच्या वर्गात येऊन सदर विद्यार्थिनीला कॉपी देण्याचा प्रयत्न केला असता त्या विद्यार्थिनीने कॉपी घेण्यास नकार दिला. त्या नंतर तो तरुण वर्गातून निघून गेला मात्र दुपारी पेपर सुटल्यानंतर सदर विद्यार्थिनी आपल्या नातेवाईकासह शाळेच्या बाहेर आल्यावर सिद्धार्थ भालेराव व त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीच्या रस्ता अडवून मी आणलेली कॉपी का घेतली नाही? मी तुला आवडत नाही का ? तू मला खूप आवडते असे म्हणत सिद्धार्थ व त्याच्या मित्रांनी सुद्धा कॉपी न घेण्याचे कारण विचारत तो तुला पटत नाही का? असे म्हणत सदर विद्यार्थिनीला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने घरी येऊन तिच्या नातेवाईकांना आई-वडिलांना या आपबीतीची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांसह विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दिल्यावरून सिद्धार्थ काशिनाथ भालेराव व त्याचे मित्र राहुल जितेंद्र भालेराव, धीरज मुकुंदा भालेराव, गौरव मुकुंदा भालेराव, जयेश काशिनाथ भालेराव, विपुल दिलीप भालेराव, सुरज भालेराव उर्फ (बंटी दादा), सागर लोखंडे, जिवन पंढरीनाथ वराडे व अन्य पाच अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, फौजदार आधार निकुंभे व सहकारी करीत आहे.