भिक मागण्यासाठी ९ वर्षीय मुलाला पळविण्याचा प्रयत्न : महिलेला अटक

0

रामेश्वर कॉलनीतील प्रकार

जळगाव- शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरात किराणा दुकानावर दूध घेण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलाचे तोंड दाबून त्याला ओढून अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजेदरम्यान घडली. नागरिकांच्या सर्तकेतेने प्रकार उघड झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी गाठून संशयित नाजीमा अब्दुल रज्जाक शेख उर्फ नाजीमा ईस्माईल मुल्ला (वय 35 रा.अंकलेश्‍वर, ऊमरवाडा, गुजरात) हिला अटक केली आहे. महिलांना पळविणारी गुजरातची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त होत असून घटनेने खळबळ उडाली आहे.

शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरातील तुलसी अपार्टमेंट, राज शाळेजवळ संदीप पुंडलिक मुळे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ते खाजगी नोकरी करुन उदनिर्वाह करतात.

नागरिकांनी महिलेला केले पोलीस ठाण्यात जमा
शनिवारी सकाळी 6 वाजता संदीप मुळे यांनी त्यांचा मुलगा सार्थक संदीप मुळे वय 9 यास परिसरातीलच एका दूध घेण्यासाठी किराणा दुकानावर पाठविले. यादरम्यान एका महिलेने त्याचे तोंड दाबले व त्याला पकडून ठेवत त्याचे खिशे तपासले. मुलाने अनोळखी महिला असल्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांची गर्दी पाहताच महिलेने सार्थकला सोडून दिले. यानंतर नागरिकांना महिला मुलाचे अपहरण करण्याचा संशय आल्याने नागरिकांनी तिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

भिक मागण्यासाठी करत होती अपहरण
मुलाच्या अपहरण प्रकरणी संदीप मुळे यांच्या फिर्यादीवरुन महिले विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोरे करीत आहेत. त्यांनी संशयित महिलेची विचारपूस केली असता तिने आपले नाव व गाव नाजीमा अब्दुल रज्जाक शेख उर्फ नाजीमा ईस्माईल मुल्ला (वय 35 रा.अंकलेश्‍वर, ऊमरवाडा, गुजरात) असे सांगितले. दरम्यान गुजरातून ती जळगावला का आली, पोलीस ठाण्यात आणल्यावर नाजीमा मनोरुग्ण असल्याचे भासवित होती. भिक मागण्यासाठी ती मुलाचे अपहरण करत असल्याची माहिती मिळाली असून गुजरातच्या महिलांची टोळी सक्रिय असल्याचा अंदाज पीएसआय वाठोरे यांनी व्यक्त केला आहे.

संशयित महिलेला 10 पर्यंत पोलीस कोठडी
संशयित नाजीमा अब्दुल रज्जाक शेख उर्फ नाजीमा ईस्माईल मुल्ला हिस अटक केल्यानंतर तिला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित बालकाला पळवून कोठे घेवून जाणार होती, तिच्या आणखी काही अरोपी आहेत काय?, यापूर्वी असे काही गुन्हे केले काय? मुले पळवून त्यांची विक्री करणारी टोळी असल्याची शक्यता आहे? मख्य सूत्रधार कोण आदी कारणांसाठी पोलीस कोठडीची विनंती करण्यात आली. त्यावरुन न्यायालयाने महिलेला 10 पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात तिच्याकडून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.