भीमा-कोरेगाव: गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारला !

0

मुंबई: भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी लेखक गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र कोर्टाने अर्ज फेटाळून लावले आहे. पुढील चार आठवड्यात सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

शहरी नक्षलवाद्याच्या आरोपावरून गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.