भुसावळचे रणजितसिंग राजपूत ‘ग्लोबल लीडर’ पुरस्काराने सन्मानित

0 3

भुसावळ- जागतिक सामुदायिक सामाजिक जबाबदारी (वर्ल्ड सीएसआर डे) दिनानिमित्त मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात संपूर्ण राष्ट्रातील 100 जागतिक स्थतावर कार्य करणार्‍या समाजसेवकांना सन्मानित करण्यात आले. जागतिक स्थतावर संयुक्त राष्ट्र संघाच्या 17 ध्येय धोरणानुसार प्रत्यक्षात कार्य करणार्‍या शंभर प्रतिनिधींना ‘ग्लोबल लीडर’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यात भुसावळ शहराचे भुसावळ नगरपालिकेचे स्वच्छतादूत तथा संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांचाही समावेश आहे. पर्यावरण विकासाच्या कामगिरीमुळे त्यांना जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल लीडर’ पुरस्कार समन्वयक संयुक्त राष्ट्र संघटना शाश्वत सामाजिक जबाबदारी प्रमुख – युरोप मध्य पूर्व आणि आफ्रिका ह्यांचा हस्ते डॉ.क्लावूस स्टीग पेडेरेसन यांच्या हस्तेदेऊन गौरविण्यात आले.

आदर्श इतरांनीही घ्यावा -राजपूत
माझ्यासारख्या तरुण युवकांने स्वच्छता व पर्यावरण श्रेत्रात कार्य करून शहरात बदल घडविले याचा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा, माझ्या सारख्या तरुणाला जागतिक स्तरावर गौरविण्यात आले तसेच जागतिक स्तरावर कार्य करण्याची संधी प्राप्त झाली याबद्दल आनंद होत असल्याचे रणजीतसिंग राजपूत म्हणाले.